Text Widget

Wednesday, 6 November 2019

अधिकारी व्हायचंय ! मग हे महत्वाचे काही करिअर तंत्र आणि मंत्र....


"जर आपण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये योग्य उमेदवार निवडले नाही तर आपल्याला फक्त पाच वर्षे पश्चात्ताप करावा लागेल. परंतु जर आपण आपल्या करियर निवडणुकीत चुकीचे क्षेत्र निवडले तर तुम्हाला जीवघेणा परिणाम भोगावा लागेल, कारण पुढील संधी कधी उपलब्ध होईल याचा कालावधी निश्चित नाही. त्यामुळे मित्रांनो, आज पासूनच संकल्प करा, की मी निवडणार आहे माझे सर्वोत्तम करिअर! अणि तेहि योग्य वेळीच. ह्या पोस्ट मधे तुम्हाला संकल्प सिद्धीस जाण्यासाठी हे काही करिअर मंत्र व तंत्र.आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना अगदी शालेय जीवनपासूनच स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. सामान्य अध्ययन क्षमतेसोबत उच्च बुद्धीमत्ता व वैचारिक क्षमता असणारे, मिळविलेल्या ज्ञानाचे व्यवहारिक उपयोजन उत्तमरित्या करता येणारे विद्यार्थी यात यशस्वी होतात. विद्यार्थी यशस्वी होण्यामागे विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, विद्यार्थ्यांना योग्यवेळी मिळालेले मार्गदर्शन, तज्ज्ञांचे प्रशिक्षण या घटकांचा मोलाचा सहभाग असतो. govtjobson.com ह्या जॉब पोर्टल तर्फे शैक्षणिक क्षेत्रात अनेक विद्यार्थी हिताचे व समाज हितोपयोगी आणि जनजागृती वर महत्वाचे पोस्ट लिहिले जातात. त्यापैकी ही एक पोस्ट म्हणजेच अधिकारी व्हायचंय !  मग हे महत्वाचे काही करिअर तंत्र आणि मंत्र... या पोस्ट अंतर्गत स्पर्धा परीक्षेबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या हेतूने आम्ही ही पोस्ट शेयर केली आहे.

ह्या पोस्ट प्रमाणेच विद्यार्थ्यांना ह्या govtjobson.com माध्यमातून स्पर्धा परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तोंडओळख होऊन त्यांच्या मनातील भिती घालविण्याच्या उद्देशाने प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात येणार आहे. पदवीनंतर घ्याव्या लागणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी, ही खरे तर शालेय जीवनातूनच करायला हवी. शालेय जीवनात असताना मुलांनी ऑलंपीयाड, स्कॉलरशीप व इतर स्पर्धा परीक्षा दिल्यातर निश्चितच ह्याच वयात मुलांमध्ये स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचे कौशल्य निर्माण होते आणि त्याचा फायदा त्यांना पुढे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठीए होऊ शकतो.

govtjobson.com ह्या जॉब पोर्टल मुले सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचा प्रशासकीय क्षेत्रातील सहभाग वाढविताना त्यांच्यात सामाजिक बांधिलकी व सर्वांना बरोबर घेऊन - जाण्याची वृत्ती वाढविण्यास पूरक असे सशक्त व सुदृढ पर्यावरण निर्मितीचा जो उद्देश आहे, तो साध्य करण्यासाठी सर्वजण आपापल्या परीने सहभागी होत असल्याने आम्हास खुपच प्रोत्साहन मिळत आहे.

govtjobson.com ह्या जॉब पोर्टल मुळे ग्रामीण विद्यार्थ्यात, ते स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन खअड, खझड, जिल्हाधिकारी, तहसीलदार, बँकेत अधिकारी किंवा कुठल्याही क्षेत्रात अधिकारी होऊ शकतात, याबाबत मोठ्या प्रमाणावर आत्मविश्वास व जागरुकता निर्माण केली. या निमित्ताने जिल्हा (राष्ट्रीय) स्तरावर स्वत:चे कर्तृत्व गाजविण्यासाठी पोषक वातावरण जिल्हाभर निर्माण केले आहे व या वातावरणाचा सुयोग्य व परिणामात्मक वापर करण्याचे कौशल्य व जिद्द या मुलांकडे निश्चितच आहे. आधुनिक समाजात प्रशासनाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालल्याने त्या क्षेत्राकडे जास्तीत जास्त युवक आकर्षिले जाणे स्वाभाविकच आहे.

कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील वयाची पहिली २० ते ३० वर्षे अतिशय उमेदीची असतात आणि या वयातच त्यांच्या कर्तृत्वाला पालवी फुटत असते. त्याला जोड शालेय जीवनातील विद्यार्थ्याने घेतलेली मेहनतीची असते आणि या काळात योग्य मार्गदर्शनाद्वारे अतिरीक्त मेहनत केली तर त्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळते आणि ते विद्यार्थी प्रशासकीय क्षेत्राबरोबरच सर्व क्षेत्रात चमकतात.

थोर माणसे आणि सामान्य माणूस यांच्यात एकच फरक असतो आणि तो म्हणजे थोर माणसाकडे स्वप्न पाहण्याचे धैर्य असते, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असते, अशी माणसे त्यांच्या आयुष्यात हेतू शोधतात आणि तो साध्य करण्यासाठी स्वत:ला झोकून देतात. थोरपणाशी किंवा एखाद्या यशाशी श्रीमंतीचा, वैभवाचा कधी संबंध नसतो. पूर्वजांची पुण्याई किंवा प्रसिद्धी तेथे कामाची नसते. सत्याचा शोध घेऊन एखादे उद्दीष्ट ठरवून, तडजोड न करता कोणतीही किंमत चुकवून घेय साध्य करण्यासाठी ही माणसे अव्याहत, अविरत, प्रामानिकपणे कथोर परिश्रम करतात. कठोर परिश्रम प्रमाणिकपणे, दूरदृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचे भानच सर्वसामान्य व्यक्तीला असामान्य बनविते. ध्येयवेडी माणसे तहानभूक विसरून, स्वत:च्या विश्वातच रमतात आणि अफाट यशस्वी होतात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. स्वत:चे एक आगळेवेगळे विश्व निर्माण करून आदर्श करिअरपर्यंत पोचण्यासाठी विद्यार्थ्यांचे अभ्यासातच रमले पाहिजे, तल्लीन झाले पाहिजे.

योग्य करिअरचा रोड मॅप


  • विविध पर्यायांची जाणीव (Awareness of alternatives)
  • कालावधी : साधारणपणे आठवीची परीक्षा दिल्यापासून ते दहावीचा निकाल लागेपर्यंत. अर्थात, विद्यार्थ्यांच्या वयाच्या चौदाव्या/पंधराव्या वर्षापर्यंत.
  • कशाप्रकारे? : यासाठी शिक्षक (शाळा), पालक आणि विद्यार्थी यांच्या काही भूमिका वेगवेगळ्या, तर काही सामायिक असतात. यासाठी बहुतेक शाळांमध्ये आठवीपासून व्यवसाय मार्गदर्शनपर व्याख्याने, शिबिरे, प्रदर्शने घेतली जातात; परंतु ते शाळेतील सर्व विद्यार्थी डोळ्यांसमोर ठेवून सर्वसाधारण स्वरूपाचे असतात. पालकांनी मात्र आपल्या पाल्याचा स्वाभाविक कल, आवड ( Aptitude) तसेच बौद्धिक, शारीरिक, आर्थिक क्षमता (Capacity) आणि या सर्वांना साजेसे असलेल्या करिअरला भविष्यातील संधी | (Prospect ) यांचाच विचार करून आपली भूमिका वठवावी.


Share:

0 comments:

Post a Comment